Redmi Note 12 लाँच, 5,000mAh बॅटरीसह कॅमेरा 50mp , किंमत 8,999 रुपयांपासून सुरू

Redmi Note 12C, Redmi Note 12 4G भारतात लॉन्च झाला . दोन्ही स्मार्टफोन 4G आहेत , तुम्हाला काही गोंधळ झाला असेल, कारण कंपनीने Redmi Note 12 सीरीज आधीच लॉन्च केली होती, पण आता त्याचे 4G वेरिएंट लॉन्च केले आहे
चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन Redmi Note 12 आणि Redmi 12C लॉन्च केले , दोन्ही स्मार्टफोन 4G आहेत आणि कंपनीने यापूर्वी Redmi Note 12 5G प्रकार लॉन्च केला होता पण आता त्याचे 4G व्हेरियंट लाँच होत आहे.


Redmi 12C च्या बेस मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे . तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे आणि त्याची किंमत 10,999 रुपये एवढी आहे.Redmi Note 12 4G ची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 64GB स्टोरेज आहे, तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.Redmi 12C मध्ये 6.71-इंचाचा HD Plus डिस्प्ले आहे. यात 60Hz चा स्टँडर्ड रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित MIUI 13 वर चालतो.

Redmi 12C मध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि मायक्रो USB पोर्ट आहे. या फोनची बॅटरी 5,000mAh आहे आणि प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे आणि
सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे .

Leave a Comment